esakal | धोम हत्‍याकांडाची सुनावणी ९ ऑक्टोबरला Satara
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

धोम हत्‍याकांडाची सुनावणी ९ ऑक्टोबरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : धोम (ता. वाई) येथील हत्‍याकांड प्रकरणाची पुढील सुनावणी ता. ९ ऑक्‍टोबर रोजी होणार असून, आजच्‍या कामकाजादरम्‍यान माफीचा साक्षीदार ज्‍योती मांढरे हिची साक्ष अपूर्ण राहिली.

वाई येथील मंगला जेधे यांच्‍या खूनप्रकरणी अटक केल्‍यानंतर धोम (ता. वाई) येथील संतोष पोळने सहा खुनांची कबुली दिली होती. यानुसार पोलिसांनी धोम येथील पोळ याच्‍या पोल्‍ट्री फार्म, तसेच घराजवळ खुदाई करत मानवी सांगाडे जप्‍त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी संतोष पोळ आणि ज्‍योती मांढरे या दोघांना अटक केली होती. अटकेतील पोळ, मांढरे यांच्‍याविरोधातील तपासाअंती तयार केलेले दोषारोपत्र पोलिसांनी न्‍यायालयात सादर केले आहे. यावरील सुनावणी आज सातारा येथील विशेष न्‍यायालयात झाली.

हेही वाचा: मुंबई : लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या 'विशेष गाड्या' बंद कराव्यात

यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्‍वल निकम हे उपस्‍थित राहिले होते. सुनावणीदरम्‍यान आजच्‍या न्‍यायालयीन कामकाजादरम्‍यान ज्‍योती मांढरे हिची साक्ष अपूर्ण राहिली. सुनावणीदरम्‍यान पोळ याच्या वतीने कायदेशीर बाबी पुढे करत कामकाजात अडथळे आणण्‍याचा प्रयत्‍न होत होता. यामुळे सुनावणीचे कामकाज अनेक वेळा रेंगाळले. या खटल्‍याची पुढील सुनावणी ता. ९ ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

loading image
go to top