esakal | आठवडी बाजार बंद असल्याने अडचण; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

आठवडी बाजार बंद असल्याने अडचण; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर : कोरोनाची (Corona) भयावह परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने बाजारपेठेतील सर्व व्यवहार जवळजवळ सुरू झाले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) येथील बंद असलेला आठवडे बाजार अजूनही सुरू झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना (farmers) कमी दरामध्ये भाजीपाला व्यापाऱ्यांना विकावा लागत असून, हाच भाजीपाला ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करवा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, येथील शेतकरी व ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

पुसेगावच्या आठवडे बाजारास परिसरातील २० ते २५ गावांचा संपर्क येतो. यामुळे या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. तसेच या आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे छोटे–छोटे व्यावसायिकदेखील आपली दुकाने घेऊन येतात. भाजीपाला, फळे, कापड, धान्य, चप्पल, कटलरी साहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी-विक्री होऊन छोट्या व्यावसायिकांच्या देखील पदरात दोन पैसे पडतात. मात्र, ग्रामीण भागातील भरणारे हे आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकरी तसेच छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक चक्र थांबले आहे. पुसेगावच्या आठवडे बाजारात होणारे किरकोळ व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण होऊन हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचे हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्राला गती देण्यासाठी आठवडे बाजार सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी देण्याची गरज दिसून येत आहे.

हेही वाचा: भायखळा कारागृहात 4 मुलांसह 43 महिला कैद्यांना कोरोनाची लागण

‘‘पुसेगाव पंचक्रोशीतील ग्राहकांना रास्त दरात भाजीपाला मिळावा आणि शेतकऱ्यांनाही थेट भाजीपाला विक्रीसाठी हक्काची जागा मिळावी, यासाठी पुसेगावचा आठवडा बाजार सुरू होणे गरजेचे आहे.’’

-धीरज जाधव, भाजीपाला उत्पादक शेतकरी, पुसेगाव

loading image
go to top