Twin Sisters Make It Big: Dipali from Diskal Selected in UPSC ISS Exam
Sakal
सातारा
UPSC Success Story:'यूपीएससी परिक्षेत डिस्कळच्या दीपालीचा राज्यात डंका';आयएसएस अधिकारीपदी निवड; दोन्ही जुळ्या बहिणींचे सुयश
Dipali from Diskal Shines in UPSC: आई गृहिणी असून, घरची सर्व शेती सांभाळते. भाऊ योगेश यांचे पुसेगाव व डिस्कळ येथे स्वतःचे कोचिंग क्लास आहेत. बहीण रूपाली या भारतीय सांख्यिकी सेवा या विभागात आयएसएस अधिकारी आहेत. वडील दशरथ व बंधू योगेश हे शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे दीपालीने भरपूर शिकावे व प्रशासकीय अधिकारी बनावे, हे दोघांचे स्वप्न होते.
पुसेगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत डिस्कळ (ता. खटाव) येथील दीपाली दशरथ कर्णेने राज्यात पहिली, तर देशात २४ वी रँक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे. शेतकरी कुटुंबातील रूपाली आणि दीपाली या दोन्ही जुळ्या मुली आयएसएस अधिकारी झाल्याने सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे.

