esakal | आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी महाबळेश्वरला निधी देऊ; केंद्रीय संचालकांचं आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

Binay Kumar Jha

स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या महाबळेश्वर पालिकेला बिनय कुमार झा यांनी नुकतीच भेट दिली.

आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी महाबळेश्वरला निधी देऊ

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. त्यांना त्याच दर्जाच्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. पालिकेने (Mahabaleshwar Municipality) त्यादृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पासाठी (International Project) केंद्र शासनाच्या वतीने निधी पुरविण्यात येईल, असे आश्वासन भारत सरकारच्या (Government of India) राष्ट्रीय अभियानाचे संचालक बिनय कुमार झा (Director Binay Kumar Jha) यांनी दिले. (Director of National Mission Binay Kumar Jha visited Mahabaleshwar Municipality bam92)

स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan) स्पर्धेत सहभागी महाबळेश्वर पालिकेला बिनय कुमार झा यांनी नुकतीच भेट दिली. त्या वेळी त्यांनी वरील ग्वाही दिली. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. दोन दिवसांत झा यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या विविध उपक्रमांना भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये महाबळेश्वर शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारे दोन जलस्रोत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सार्वजनिक स्वच्छतागृह, होम कंपोस्टिंग, नाईट व डेली स्वीपिंगच्या माध्यमातून होत असलेली शहर स्वच्छता यांची पाहणी केली. कचरा विलगीकरणासंदर्भात काही घरांना भेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी पालिकेच्या स्वच्छतेच्या कामाची माहिती घेतली. महाबळेश्वरातील १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या हॉटेलमधील कचऱ्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते याची पाहणीही त्यांनी केली. स्वच्छता व विविध प्रकल्पांची पाहणी करून त्यांनी मुख्याधिकारी पाटील यांच्याजवळ पालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले़.

हेही वाचा: 'महिलांनो.. तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं, तर त्याला धडा शिकवा'

महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले पाहिजे. त्यादृष्टीने पालिकेने आतापासूनच कामाला लागावे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुलभ शौचालय येथे आवश्यक आहे. प्रतिकूल हवामानामुळे घनकचरा व्यवस्थापनाबाबत विविध अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेऊन येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) केले पाहिजे. यासाठी पालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा. त्याचा नक्कीच विचार करून प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन झा यांनी दिले. महाबळेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वेण्णालेक व ग्लेन ओगल या दोन तलावांची पाहणी करण्यासाठी पथकाने स्पीड बोटीद्वारे तलावातून फेऱ्या मारल्या व तलावातील स्वच्छ पाणी व तलावाचा स्वच्छ परिसर पाहून समाधान व्यक्त केले. शहरात दिवसा व रात्री अशा दोन वेळा स्वच्छता केली जाते. अशा प्रकारे दोन वेळा शहर स्वच्छ करणाऱ्या महाबळेश्वर पालिकेचे झा यांनी विशेष कौतुक केले.

हेही वाचा: 'मराठा आंदोलकांवर गुन्हे; मग पटोले, चव्हाण, भाई जगतापांवर का नाही?'

पालिका वॉटर प्लससाठी पात्र

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर झा यांनी पालिकेच्या कामाचे विशेष कौतुक केले. अशा प्रकारे तीन टप्प्यात सांडपाण्यावर प्रक्रिया शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या पालिका बोटावर मोजण्याइतक्या आहेत. यामध्ये महाबळेश्वर पालिकेचा समावेश आहे. महाबळेश्वर शहरातील स्वच्छता विभागाचे काम पाहून महाबळेश्वर पालिका या पूर्वीच ओडीएफ प्लस प्लसकरिता पात्र असून, आता त्यापुढे जाऊन महाबळेश्वर पालिका वॉटर प्लससाठी पात्र असल्याचेही झा यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी पाटील यांना सांगितले.

Director of National Mission Binay Kumar Jha visited Mahabaleshwar Municipality bam92

loading image