Phaltan Car fire: चिमुकल्यांच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना! फलटणच्या भरवस्तीत मोटारीला आग; चार जणांना वाचविण्यात यश..

fire breaks out in car in Phaltan busy locality: ईशा आणि सार्थकच्या धाडसाने वाचले चार जीव; शहरात कौतुकाची लाट
Major Mishap Averted After Car Bursts Into Flames in Busy Phaltan Locality

Major Mishap Averted After Car Bursts Into Flames in Busy Phaltan Locality

sakal

Updated on

-मनोज पवार

दुधेबावी: फलटण शहरातील वर्दळीच्या ठिकाणी शंकर मार्केट ब्राह्मण गल्ली येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास चारचाकी मोटारीला आग लागली. या परिसरातील १२ वर्षीय ईशा पाटणे व १४ वर्षीय सार्थक हिरणवाळे या दोघांनी कार्यतत्परता दाखवत अग्निशामक दलाच्या १०१ नंबरला मोबाईलवरून माहिती दिली. यामुळे वेळीच आग विझविण्यात अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. सार्थकने आरडाओरडा करत मोटारीतील चार जणांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com