esakal | कोयना धरणातून 50,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

koyan dam

कोयना धरणातून 50,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी मुसळधार पाऊसाचा जोर कायमच आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाच्या सरीवर सरी पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३९३१८ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊसाने थैमान घातले असून कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.

हेही वाचा: चारा छावणी दफ्तर तपासणीप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद

धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता संपली असून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाने थैमान घातल्याने वाढत जाणारी धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यावर पूर्णपणे लक्ष देणाऱ्या कोयना धरण व्यवस्थापनाने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे ५ फुट ३ इंचावरसताड उघडे केले असून धरणातून नदीपात्रात ५०,००० कूसेस्क पाण्याचा विसर्ग होत आहे.

गत चार दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी मुसळधार पाऊसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत.कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरले असून रविवार पासुन धरणाची जल पातळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पायथा वीज गृह कार्यान्वीत करण्यात आला आहे.पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायमच असल्याने कोयना-कृष्णा नदी च्या पाणीपातळीत वाढच होत आहे.

पाणलोट क्षेत्रातील नवजा ,महाबळेश्वर व वलवण या ठिकाणी मुसळधार पाऊसाचे माहेरघर ठरविण्यासाठी जोरदार स्पर्धाच लागली आहे. कोयनानगर येथे ६५ (४०९५ मीमी ) नवजा येथे ७५ (५३८५ मीमी) महाबळेश्वर येथे ९८ ( ५४७५ मीमी) वलवण येथे १०५ (६४५५मीमी) पाऊसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २१६३.३ फुट झाली असून धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

loading image
go to top