

Satara Zilla Parishad takes action: 185 teachers, including senior Gurujis, transferred to remote schools as part of disciplinary reshuffle.
Sakal
सातारा : प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्र, शारीरिक पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या याचबरोबर तपासणीस गैरहजर असणाऱ्या १८५ शिक्षकांची दुर्गम भागात शिक्षेची बदली केली जाणार आहे. तसेच ज्या शिक्षकांची नियमानुसार बदली झाली आहे, अशांना तीन नोव्हेंबरला कार्यमुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत. या आदेशानंतर तत्काळ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे.