पाटणला इच्छुकांचा भ्रमनिरास; सतरापैकी नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटणला इच्छुकांचा भ्रमनिरास; सतरापैकी नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव

पाटणला इच्छुकांचा भ्रमनिरास; सतरापैकी नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव

sakal_logo
By
- जालिंदर सत्रे

सातारा (पाटण) : पाटण नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज झालेल्या आरक्षण सोडतीत १७ प्रभागांपैकी नऊ प्रभाग महिला राखीव झाल्याने अनेक दिग्गज इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी २, ५, ७, १४ आणि १५, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी १२ व १६, नागरिकांचा मागासवर्गातील महिलेसाठी १० व १३ हे नऊ प्रभाग आरक्षित झाले. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक नऊ आरक्षित झाल्याने अनेकांच्या इच्छेवर विरजण पडले.

येथील श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात प्रांताधिकारी सुनील गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत झाली. त्यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय ऊर्फ बापू टोळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, गावकामगार तलाठी जयेश शिरोडे, अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व पाटणमधील अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते. प्रारंभी लोकसंख्येचा निकष व उतरत्या चक्राकार क्रमाने आरक्षणे जाहीर करण्यात आली. त्यात पहिल्यांदा अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास वर्ग, सर्वसाधारण महिला व शेवटी सर्वसाधारण असे प्रभागनिहाय आरक्षणे जाहीर करण्यात आली. लहान मुलांकडून आरक्षित चिठ्ठ्या काढून आरक्षित प्रभाग जाहीर करण्यात आले.

हेही वाचा: "मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

प्रवर्गनिहाय पडलेले आरक्षण...

सर्वसाधारण प्रवर्ग-प्रभाग ४, ६, ११, १७, सर्वसाधारण महिला- २, ५, ७, १४, १५, नागरिकांचा मागास वर्ग- ३, ८, नागरिकांचा मागास वर्ग महिला- १०, १३, अनुसूचित जाती- १, अनुसूचित जाती महिला- १६, १२, अनुसूचित जमाती- ९.

loading image
go to top