esakal | आत्तापर्यंत दहा कोटींवर स्वाक्षऱ्या; नगराध्यक्षांचे 'आरोग्य'वर ताशेरे
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor Rohini Shinde

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी ठरावावर स्वाक्षऱ्या न केल्याने घंटागाड्या बंद पडल्याची स्थिती समोर आली, त्यावरून लोकशाही, जनशक्ती आघाडीने नगराध्यक्षांना लक्ष्य केले आहे.

आत्तापर्यंत दहा कोटींवर स्वाक्षऱ्या; नगराध्यक्षांचे 'आरोग्य'वर ताशेरे

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : पालिकेत वेगवेगळ्या मुद्दांवरून खडाजंगी होत असते. स्वाक्षरीवरून पेटलेले कऱ्हाड पालिकेतील (Karad Municipality) राजकारण अद्यापही थंड होण्यास तयार नाही. नगराध्यक्षांनी एक कोटी ६९ लाखांच्या तब्बल ३५ ठरावांवर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत, अशी वस्तुस्थिती विशेष सभेत आरोग्य सभापती विजय वाटेगावकर (Health Chairman Vijay Wategaonkar) यांनी मांडली. त्याला प्रतित्युत्तरादाखल आत्तापर्यंत दहा कोटींच्या बिलांवर नगराध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्याचे दिसले नाही का?, असा प्रतिप्रश्न नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी केला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असल्याने स्वाक्षरी पुराण संपणार तरी कधी, अशीच सामान्यांची भावना आहे. चार वर्षात न उद्भवलेला प्रश्न आता बाहेर काढून आगामी निवडणुकीत स्वाक्षरी प्रकरणालाच कळीचा मुद्दा करण्याची व्यूव्हरचना आखण्याचे काम प्रत्येकाकडून सुरू आहे, हेच वास्तव आहे. (Dispute Started In Karad Municipality With The Signature Of Mayor Rohini Shinde bam92)

घंटागाड्यावरून चार दिवस पालिकेत गदारोळ सुरू होता. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी ठरावावर स्वाक्षऱ्या न केल्याने घंटागाड्या बंद पडल्याची स्थिती समोर आली, त्यावरून लोकशाही (Lokshahi Aghadi), जनशक्ती आघाडीने (Janshakti Aghadi) नगराध्यक्षांना लक्ष्य केले. घंटागाड्या विस्कळीत होऊन झालेल्या गैरसोयीपेक्षाही नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा विषय गाजला. नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीवरून यापूर्वीही गदारोळ झाला. स्वाक्षऱ्याअभावी विलगीकरण कक्षही उशिरा सुरू झाल्याने विरोधकांनी घेरले होते. स्वाक्षरी होत नाही, अशी होणारी ओरड आता सराईत झाली आहे. त्यामुळे पालिकेत स्वाक्षरी पुराण संपेल अशी स्थिती नाही. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न होत नाहीत. केवळ बघ्याच्या भूमिका असलेल्या प्रशासनाचा यावर अंकुश नाही.

हेही वाचा: कऱ्हाड पालिकेत पतींच्या उचापतींवरून हमरीतुमरी

पालिकेच्या प्रत्येक सभेत आरोप होतो. पण, प्रत्यक्षात कारभारात सुधारणी होत नाही. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी कालच्या सभेतही नगराध्यक्षांना लक्ष्य केले. त्यांनी पुन्हा स्वाक्षरीकडे साऱ्यांचे लक्ष वेधले. नगराध्यक्षांकडे असलेल्या एक कोटी ६९ लाखांच्या ३५ ठरावांवर त्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत, असे वाटेगावकर यांनी सांगितले. त्यामुळे खळबळ उडून जोरदार खडाजंगी झाली. दहा कोटीवर केलेल्या स्वाक्षऱ्या दिसत नाही का, असे नगराध्यक्षा शिंदे यांनी विचारले. त्यावरून पालिकेत स्वाक्षरी पुराणावरून राजकीय सुंदोपसुंदीच रंगणार, हेच वास्तव आहे. आगामी निवडणुकीत स्वाक्षरीचा मुद्दा कळीचा व प्रचाराचा ठरविला जाणार आहे. त्या दृष्टीने आघाड्यांची तयारी आहे. त्यासाठी व्यूव्हरचनाही आखली जात आहे.

हेही वाचा: गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव; भाजप नेत्याची टीका

नगराध्यक्षांनी किती स्वक्षाऱ्या केल्या, त्याची माहिती सांगितली जात नाही, आत्तापर्यंत दहा कोटींवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यातील किती बिले अदा झाली, त्याची आरोग्य सभापतींनी माहिती घ्यावी, मगच आरोप करावेत.

-रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड

कोविडच्या स्मशानभूमीच्या ठरावावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी नाही, त्यामुळे ते बिल देता आलेले नाही. तब्बल एक कोटी ६९ लाखांच्या ठरावावर स्वाक्षऱ्या नाहीत. छोट्या कामांची बिले अडकली की, अडचणी येतात. त्यामुळे स्वाक्षऱ्या कराव्यात.

-विजय वाटेगावकर, सभापती, आरोग्य विभाग, कऱ्हाड

Dispute Started In Karad Municipality With The Signature Of Mayor Rohini Shinde bam92

loading image