रहिमतपूरला लोकसहभागातून ऑक्‍सिजन मशिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहिमतपूरला लोकसहभागातून ऑक्‍सिजन मशिन

कोरोनाबरोबर जगण्यासाठी आणि लढण्यासाठी आम्ही तयारीचे एक पाऊल त्यांच्याकडून टाकण्यात आले आहे. बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णालयात बेडचा तुटवडा जाणवत आहे, त्या वर उपाययोजना म्हणून शासनाने "होम आयसोलेशन' संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.

रहिमतपूरला लोकसहभागातून ऑक्‍सिजन मशिन

रहिमतपूर (जि. सातारा) : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ऑक्‍सिजनविना प्राण जाऊ नये, यासाठी येथील रॉकडेश्वर गल्लीमधील नागरिकांनी वर्गणी काढून तीन ऑक्‍सिजन मशिन व प्लस ऑक्‍सिमीटर खरेदी केले आहेत. रोकडेश्वर गल्ली येथील नागरिकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून जवळपास एक लाख 25 हजार रुपये जमा केले. त्यातून तीन ऑक्‍सिजन मशिन खरेदी करून आदर्श घालून दिला. 

कोरोनाबरोबर जगण्यासाठी आणि लढण्यासाठी आम्ही तयारीचे एक पाऊल त्यांच्याकडून टाकण्यात आले आहे. बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णालयात बेडचा तुटवडा जाणवत आहे, त्या वर उपाययोजना म्हणून शासनाने "होम आयसोलेशन' संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेत ऑक्‍सिजन मशिनचा उपयोग होऊ शकतो व रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवला जाऊ शकते. 

उंब्रज पोलिसांनी केला सव्वा लाखाचा दंड वसूल

या एका मशिनवर एकावेळी दोन जणांना ऑक्‍सिजन दिला जाऊ शकतो. रोकडेश्वर गल्लीने एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी लोकार्पण करताना वासुदेव माने, सुखदेव माने, नंदकुमार माने, विक्रमसिंह माने, विद्याधर बाजारे, डॉ. अमित माने, अरुण माने पाटील, जगगनाथ माने, नितीन माने, अधिक माने, आप्पासाहेब मोरे, भीमराव सावंत, सोमनाथ पोतदार व इतर नागरिक उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Web Title: Distribution Oxygen Machine Rahimatpur Satara News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
go to top