
कास: सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाचा मुकुटमणी असलेल्या कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाची सुरुवात गुरुवारपासून (चार सप्टेंबर) करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या कार्यालयात नुकताच घेतला. त्यानंतर आज श्री. पाटील यांनी कास पठारावर जाऊन पाहणी केली.