
मान्सूनचा संकटकाळ! आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
सातारा : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज राहावे, तसेच संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष एक जूनपासून कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी केल्या आहेत. (District Collector Shekhar Singh Review Meeting On Pre-monsoon Preparations At Satara)
नैसर्गिक आपत्तीबाबत मॉन्सूनपूर्व (Monsoon) तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे, तसेच पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, "प्रत्येक विभागाने नोडल ऑफिसरची नियुक्ती करून त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. ज्या गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटतो. अशा गावांसाठी पुरेशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अधीच करावा. अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तसेच अन्य यंत्रणांना द्यावीत.
पंतप्रधान मोदी राज्याला देणार प्रतिमहिना 29 कोटी डोस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील नालासफाई, गटारी यांची साफसफाई करून घ्यावी. आरोग्य विभागाने (Health Department) आवश्यक तो औषधसाठा, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज ठेवावी. त्याचबरोबर वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात. नदीकाठी अतिक्रमण केलेल्या कुटुंबाला मॉन्सूनपूर्वी नोटीस देऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, तसेच तालुका व गावपातळीवर 20 मेपर्यंत मॉन्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घ्यावी.'' गावागावांतील सर्व नाल्यांची साफसफाई करावी. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत केल्या.
District Collector Shekhar Singh Review Meeting On Pre-monsoon Preparations At Satara
Web Title: District Collector Shekhar Singh Review Meeting On Pre Monsoon Preparations At
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..