
सातारा : ग्रामपंचायत स्तरावर विकासकामे करताना कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे विविध योजनांतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी बांधकामावरील गुणनियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कामांची गुणनियंत्रण चाचणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे गावोगावी होणारी विकासकामे दर्जेदार होतील.