Satara Doctor Case
esakal
फलटण: फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर युवतीच्या शवविच्छेदन अहवालानुसार गळफास घेतल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आत्महत्या की खून या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित प्रशांत बनकर याला आणखी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.