जम्मू-काश्मीरमधील 850 रुग्णांना डॉक्टरांनी दिली नवसंजीवनी; आतंकवाद्यांच्या भागांत किचकट ऑपरेशन यशस्वी

रोटरी क्लबला काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी तेथील गरीब-गरजू लोकांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन केले होते.
Patients in Jammu and Kashmir
Patients in Jammu and Kashmiresakal
Summary

डॉक्टरांच्या पथकाने ८५० शस्त्रक्रिया केल्या. त्यापैकी ४५० शस्त्रक्रिया या मोतीबिंदूच्या आहेत. सर्वांत जास्त शस्त्रक्रिया या मोतीबिंदूच्या करण्यात आल्या.

कऱ्हाड : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) हा देशातील स्वर्ग आहे. मात्र, तेथे सातत्याने होत असलेल्या आतंकवाद्यांच्या (Terrorism) कारवाया, हल्ला, बाँबस्फोटामुळे हा स्वर्ग संवेदनशील बनला आहे. अशा स्थितीतही तेथे अनेक जण घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे हलाखीचे जीवन जगत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या परिस्थितीचा विचार करून आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने रोटरी क्लबने पुढाकार घेऊन तेथे आरोग्य शिबिर घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Patients in Jammu and Kashmir
रात्रीचे ते वेदनादायी चार-पाच तास..; भटक्या कुत्र्याने पायाचा लचका तोडल्याने निष्पाप श्रृष्टीचा मृत्यू, मृतदेह थेट स्मशानभूमीत

त्यांच्या आजारावर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी रोटरीने काश्मीरमधील राजौरी आणि पूँच सेक्टरमध्ये डोळ्यांसह आरोग्य तपासणी शिबिर राबवले. त्याअंतर्गत तेथे विविध आजारांच्या ८५० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये ४५० शस्त्रक्रिया या मोतीबिंदूच्या (Cataracts) आहेत. त्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने संबंधित रुग्णांना नवी सृष्टी पाहण्याची नवसंजीवनीच मिळाली आहे.

Patients in Jammu and Kashmir
Sangli Tourism : दंडोबा-गिरलिंग बनेल शिव-शक्तिपीठ; 'ही' प्राचीन स्थळे होतील जिल्ह्याची ठळक ओळख

राज्यपालांचे आवाहन अन् रोटरीचे कर्तव्य

रोटरी क्लबला काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी तेथील गरीब-गरजू लोकांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मेडिकल प्रोजेक्टचे डॉ. राजीव प्रधान व डॉ. गिरीश गुणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून डॉ. शंकर गोसावी, डॉ. राहुल फासे, डॉ. अविनाश भोसले, डॉ. मिलिंद शहा यांच्यासह डॉक्टरांचे पथक काश्मीरमध्ये दाखल झाली. जम्मू-काश्‍मीरमधील राजौरी आणि पुंच्छ या आतंकवादी कारवाया होणाऱ्या भागात आरोग्य तपासणी शिबिर असल्याने डॉक्टरांच्या मनात हल्ल्याच्या भीतीचे काहूर उमटत होते. मात्र, त्याला न जुमानता डॉक्टरांच्या पथकांनी आपल्यापरीने जेवढी शक्य आहे तेवढी ताकद पणाला लावून शस्त्रक्रियांचे धनुष्य पेलले.

८५० शस्त्रक्रिया झाल्या यशस्वी

डॉक्टरांच्या पथकाने ८५० शस्त्रक्रिया केल्या. त्यापैकी ४५० शस्त्रक्रिया या मोतीबिंदूच्या आहेत. सर्वांत जास्त शस्त्रक्रिया या मोतीबिंदूच्या करण्यात आल्या. त्याचबरोबर प्लॅस्टिक सर्जरी, कान, नाक, घसा, स्त्रीरोग निदान व उपचार, पोटाच्या शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या वेळी करण्यात आल्या. तेथील रुग्णांना विविध आजारांतून बरे करून डोळ्यांच्या आजाराच्या रुग्णांना नवी दृष्टी देणे, हाच उद्देश ठेऊन डॉक्टरांनी काम केले.

Patients in Jammu and Kashmir
Depression in Children Symptoms : लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतंय नैराश्य; काय आहेत कारणे?

८८ वर्षांच्या आजोबांना मिळाली नवी दृष्टी

राजौरी सेक्टरमधील एका ८८ वर्षांच्या आजोबांचा एक डोळा अगोदरपासूनच निकामी होता. त्याचबरोबर दुसऱ्या डोळ्याची दृष्टी मोतीबिंदू खूप जास्त प्रमाणात पिकल्यामुळे गेली होती. त्यांचे वय, मोतीबिंदू जास्त पिकलेला असल्यामुळे होणारे दुष्परिणाम व एक डोळा पूर्ण निकामी असणे या सर्व बाबींमुळे त्यांच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार त्यांना दिसायचे बंद झाले होते. त्यांचे ऑपरेशन कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये होत नव्हते. खासगी हॉस्पिटलमध्ये जायचे म्हटले तर त्यांना अमृतसरशिवाय पर्याय नव्हता. हे सगळे त्यांना परवडणारे नव्हते. या शिबिरात डॉ. फासे व त्यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे त्यांना पुन्हा दृष्टी मिळाली.

जम्मू-काश्मीरमधील लोकांची आर्थिक स्थिती, उपचारांची उपलब्धता पाहता तेथे आरोग्यविषयक खूप काम करण्याची गरज आहे, हे आम्हाला तेथे गेल्यावर जाणवले. सामाजिक बांधिलकीतून रोटरीच्या माध्यमातून आम्ही तेथील ८५० रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. त्यामुळे अनेकांना नवी दृष्टी मिळाली, ही त्या रुग्णांसह आमच्यासाठीही आनंदाची बाब आहे.

-डॉ. राहुल फासे, नेत्ररोगतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com