शेणोली: शेरे येथील देशी कोंबड्यांच्या शेडमध्ये घुसून कुत्र्यांनी तब्बल १२० कोंबड्या फस्त केल्या. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास शेरे पाटी येथे ही घटना घडली. यात एक लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी राहुल माणिकराव नांगरे- पाटील यांनी दिली.