शंकररावअण्णांच्या नावचा पुरस्कार प्रेरणा देईल : प्राचार्य डॉ. अशोक भोईटे

दिलीपकुमार चिंचकर
Sunday, 30 August 2020

अण्णांनी घालून दिलेल्या सामाजिक कार्याचा वसा इथून पुढेही असाच आम्ही सुरू ठेवू, असा विश्वास डॉ. आशा जगताप यांनी व्यक्त केला.

सातारा : महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष (कै.) शंकरराव जगताप अण्णांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी निश्‍चित प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या घरातील लोकांनीच माझा केलेला उचित सन्मान आहे आणि तो मी आदरपूर्वक स्वीकारतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले.
दुर्वाचे अस्तित्व धोक्यात; जाणून घ्या नेमकं कारण

एकंबे (ता. कोरेगाव) येथे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष (कै.) शंकरराव जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षण कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा पुरस्कार प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांना आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी प्राचार्य डॉ. भोईटे म्हणाले,"" (कै.) शंकरराव जगतापअण्णांच्या जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते आमदारकीपर्यंत त्यांनी केलेले सामाजिक आणि शैक्षणिक काम निश्‍चित आम्हाला प्रेरणादायी आहे.

या खेडेगावात साकारले चिल्ड्रन हेल्थ पार्क 

अण्णांच्या प्रचारासाठी आम्ही गावोगावी फिरलो. माझे वडील आणि अण्णा यांचा जवळचा संबंध, आमच्या घराच्याजवळ अण्णांचे घर असल्यामुळे त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा सहवास आम्हाला लाभला, हे आमचे भाग्य समजतो. माझ्या सचिवपदाच्या कार्यकाळात प्रा. डॉ. एन. डी. पाटील व अण्णांमध्ये चर्चा होत असे. माझ्याविषयी असणाऱ्या त्यांच्या भावना आणि सदिच्छा व्यक्त करत असत. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती रयत शिक्षण संस्थेचा सचिव झाला, हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे असे ते सर्वांना सांगत.''

आमदारांच्या एका हाकेत उद्योगपतीने दिली लाखांची रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्स
 
आमदार शिंदे म्हणाले, " (कै.) शंकरराव जगताप यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्राचार्य डॉ. भोईटे यांनी रयत शिक्षण संस्थेचे सचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर प्र-कुलगुरू म्हणून जे काम केले आहे, ते निश्‍चित कौतुकास्पद आहे. प्राचार्य भोईटे यांनी येथून पुढे असेच शैक्षणिक कार्य करत राहावे.'' 

ग्रामपंचायतींवर शासकीय प्रशासकच, शासनाने न्यायालयात केले मान्य : याचिकाकर्त्या अर्चना देशमुख

यावेळी कोरोना काळामध्ये लोकांची सेवा करणाऱ्या आरोग्य सेविकांचाही सत्कार डॉ. आशा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. अण्णांनी घालून दिलेल्या सामाजिक कार्याचा वसा इथून पुढेही असाच आम्ही सुरू ठेवू, असा विश्वास डॉ. जगताप यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास प्रा. डॉ. सुजाता भोईटे, कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघातील (कै.) शंकरराव जगताप यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Ashok Bhoite Felicitated With Shankarrao Jagtap Award In Koregaon