

Shambhuraj Desai
sakal
सातारा : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर काल आम्ही ओघाने भेटलो असून, त्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली. शुक्रवारी शिवसेनेची बैठक होणार असून, त्यामध्ये सदस्यांचे मत जाणून त्याचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाईल. ते त्यावर योग्य निर्णय घेतील, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यातील भाजपचे नेते गप्प बसलेत असे वाटत असले तरी ते गप्प नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.