

“E-Crop Census Success: Phaltan Farmers Register in Record Numbers”
Sakal
आसू : सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक नोंद घेण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘ई- पीक पाहणी’ उपक्रमात फलटण तालुक्याने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत ‘सहाय्यक’ म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या पोलिस पाटलांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करत प्रशासकीय कामाचा आदर्श निर्माण केला आहे.