
सातारा : प्रदूषणमुक्त प्रवासासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रिक बस सुरू केलेल्या आहेत. सातारा विभागात ई-बस सुरू आहेत. मात्र, आता नव्याने काही फेऱ्या परजिल्ह्यात सुरू केल्या आहेत. यामध्ये सातारा - कोल्हापूर मार्गावर जाता- येता आठ फेऱ्या व सातारा-हिंजवडी मार्गावर आठ अशा १६ फेऱ्या सातारा विभागातून प्रथमच ई बसच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. या नवीन बसच्या संचलनामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.