Narendra Patil: आर्थिक निकषाच्या आरक्षणाने जातिभेद संपेल : माजी आमदार नरेंद्र पाटील; ‘मराठा आरक्षणाबाबत सध्या ऐतिहासिक निर्णय'
Maratha Quota Debate: २२ मार्च १९८२ मध्ये त्यांनी यासंदर्भात काढलेला मोर्चा आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिलेले स्वतःच्या प्राणाचे बलिदान अजूनही जनतेच्या स्मरणात आहे. त्यांच्या पश्चात काही मंडळींनी हा लढा पुढे सुरू ठेवला. अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला मनोज जरांगे यांच्या माध्यमातून यश आल्याचा आनंद आहे.
ढेबेवाडी : जिथे जात आली तिथे अंतर आले, त्यामुळे आर्थिक निकषावरील आरक्षणच देशाला जातीपातीच्या राजकारणापासून निश्चितपणे अलिप्त ठेवील, असे मत माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.