आमच्यामागे ईडीची चौकशी लावा; सुरेश खाडे यांनी विरोधकांना दिले आव्हान

कोणी काही चुकीचे केले की ईडीमार्फत चौकशी होते. पुरावा हातात येईपर्यंत ईडीकडून कारवाई केली जात नाही. विरोधकांनी केलेली कर्म आहेत त्यामुळे ईडी त्यांच्या मागे लागली आहे.
Minister Suresh Khade
Minister Suresh KhadeSakal
Summary

कोणी काही चुकीचे केले की ईडीमार्फत चौकशी होते. पुरावा हातात येईपर्यंत ईडीकडून कारवाई केली जात नाही. विरोधकांनी केलेली कर्म आहेत त्यामुळे ईडी त्यांच्या मागे लागली आहे.

कऱ्हाड - कोणी काही चुकीचे केले की ईडीमार्फत चौकशी होते. पुरावा हातात येईपर्यंत ईडीकडून कारवाई केली जात नाही. विरोधकांनी केलेली कर्म आहेत त्यामुळे ईडी त्यांच्या मागे लागली आहे. ईडीच्या कचाट्यात सापडलेले त्यातुन लवकर बाहेर पडणार नाहीत. विरोधकांनी आमच्या तक्रारी काढाव्या, उकराव्या आणि ईडीला द्याव्या, असे थेट आव्हान कॅबीनेट मंत्री सुरेश खाडे यांनी आज येथे विरोधकांना दिले.

मुंबईवरून सांगलीला जाताना मंत्री खाडे यांचे आज येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर ते बोलत होते. भाजपचे प्रदेश सचीव विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, घनश्याम पेंढारकर, सागर शिवदास, सुनील शिंदे, शंकर पाटील, भरत देसाई, भूषण जगताप, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, उमेश शिंदे, नितीन वास्के, नितीन शहा, विश्वनाथ फुटाणे, भूषण जगताप, गणेश कापसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री खाडे म्हणाले, कोणत्याही आकसापोटी कोणाचीही ईडी कारवाई केली जात नाही.

ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत; त्यांच्याच चौकशी केली जाते. त्यात कोणताही भेदभाव केला जात नाही. कोणी काही चुकीचे केले की ईडीमार्फत चौकशी होते. पुरावा हातात येईपर्यंत ईडीकडून कारवाई केली जात नाही. विरोधकांनी केलेली ही कर्म आहेत, ती त्यांना भोगावीच लागणार. ईडीच्या कचाट्यात सापडलेले लवकर बाहेर पडणार नाहीत. विरोधकांनी आमच्या तक्रारी काढाव्या, उकराव्या आणि ईडीला द्याव्या. ते आमच्यामागे लागुन चौकशी करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com