विद्यार्थ्यांसाठी नोकरीत नसलेलेल्या शिक्षकांनी "शिक्षक मित्र' याेजनेत पुढाकार घ्यावा : शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर

विद्यार्थ्यांसाठी नोकरीत नसलेलेल्या शिक्षकांनी "शिक्षक मित्र' याेजनेत पुढाकार घ्यावा : शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर

कऱ्हाड ः ऑनलाइन शिक्षण देवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा शासनाचा हेतू आहे. अभ्यासक्रम संपवणे हेतू त्यामागे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभाग जिल्ह्यात "शिक्षक मित्र' उपक्रम राबवणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी केले.
 
ओंड येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी साक्षी पोळने शिक्षणासाठी मोबाईल मिळाला नसल्याने आत्महत्या केल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री. क्षीरसागर यांनी साक्षीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शाळेतही भेट देवून त्यांनी माहिती घेतली. साक्षीच्या आत्महत्येच्या कारणांची त्यांनीही माहिती घेतली. त्यात घरच्या स्थितीबरोबरच तिला ऑनलाइन शिक्षणाला मोबाईल मिळाला नाही, हेही कारण आहे, असे स्पष्ट आहे, असे श्री. क्षीरसागर यांना सांगितले. कऱ्हाडला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपशिक्षणाधिकरी श्रीकांत जगदाळे, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, विस्तार अधिकारी नितीन जगताप, जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, तालुकाध्यक्ष सुधाकर चव्हाण उपस्थित होते.

काेविड 19 मृत्यूदरात देशात सातारा पाेचला तिसऱ्या क्रमांकावर
 
ते म्हणाले, ""ओंडमधील आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाला काही मदत करत आहोत. तिचा भाऊ सातवीत आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. हायस्कूल व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सवलत देण्याची सूचना केली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून "शिक्षक मित्र' उपक्रम राबवत आहोत. त्यासाठी डीएड, बीएडसारख्या शिक्षण घेतलेल्या पण नोकरी नसलेल्या नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने नोकरी नसलेलेल्या शिक्षकांना "शिक्षक मित्र' व्हावे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हातभार लावून त्यांना मार्गदर्शन करावे, असा आमचा हेतू आहे. त्यादृष्टीने काही योजना हाती घेत आहोत.'' 
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ते शिक्षण विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहावा म्हणून सुरू ठेवण्यात आले आहे.

पावसामुळे पिकं कुजण्याचा धोका वाढला; शेतकरी चिंतेत

या शिक्षणाचा ताण विद्यार्थ्यांनी घेऊ नये, असे आवाहन करून श्री. क्षीरसागर म्हणाले, ""कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहावा म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांनी त्याचा ताण घेऊ नये. माध्यमिक शाळांमध्ये 32 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही. फोनव्दारेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शासनाने दूरदर्शनवर अभ्यासक्रम शिकवण्याचाही मानस ठेवला आहे.''

साक्षे.. साक्षे...! शिक्षणासाठी आत्महत्या केलेल्या साक्षीच्या आईचा हंबरडा व्यवस्थेला चपराक

शंका निरसनासाठी शाळेत येण्याची मुभा आहे. शाळेत शिक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळे स्मार्ट मोबाईल नाही म्हणून विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. 

- राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com