‘माध्यमिक’वर शिक्षणाधिकाऱ्यांचा वॉच

सीसीटीव्हीद्वारे दालनातून ठेवणार कंट्रोल; अनेक कामांमुळे बदलला लुक
Education official watch Via CCTV Officer Prabhavati Kolekar Employees face many inconveniences Secondary department satara
Education official watch Via CCTV Officer Prabhavati Kolekar Employees face many inconveniences Secondary department satarasakal

सातारा : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या विभागातील सर्व कारभारावर आता शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या दालनातून सीसीटीव्हीद्वारे त्यांच्या नजरेसमोर राहणार आहे.जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची पूर्णतः दुरवस्था झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याच इमारतीत माध्यमिक विभाग कार्यरत आहे. कार्यालयीन कामानिमित्त दिवसभर या विभागात नागरिकांची वर्दळ सुरू असते.

परंतु, या विभागात जागेची अपुरी व्यवस्था व अन्य दुरवस्था असल्याने अनेक अडथळे निर्माण होत होते. या गैरसोयी दूर करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून माध्यमिक विभागातील डागडुजी व अन्य कामे सुरू होती. ती नुकतीच पूर्ण झाली आहेत. प्रशस्त दालन, सीसीटीव्ही कॅमेरे, रंगरंगोटी, ॲन्टी चेंबर यासह विविध कामे करण्यात आली आहेत. माध्यमिक विभागातील आस्थापना, लेखा विभाग, कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी कक्ष, विस्तार अधिकारी कक्ष, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, अभ्यागत कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता माध्यमिक विभागातील प्रत्येक कक्षातले कामकाजावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातून नजर राहणार आहे.

दरम्यान, जुन्या इमारतीत सद्य:स्थितीत एकाच विभागाची डागडुजी करण्यात आली आहे. या इमारतीत सर्वच विभागांची दयनीय अवस्था असून प्रत्येक विभागाची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. शौचालय, पाणी, कर्मचारी व अधिकाऱ्यांना बसण्यासाठी अपुरी दालने, मोडकळीस आलेल्या खुर्च्या, कपाटे यासह विविध गैरसोयींचा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील काळात या इमारतीत सर्वच विभागांची डागडुजी हाती घेण्याची गरज आहे.

माध्यमिक विभागात अनेक गैरसोयी असल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या विभागात डागडुजी करण्यात आली. विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे विविध कक्षातील कामकाजावर लक्ष राहणार आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com