
"Revenue officials in Satara district reopen 470 Paanand roads with GIS-based monitoring, ensuring transparency and farmer relief."
Sakal
सातारा: महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील व महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही बाह्य यंत्रणेची मदत न घेता स्वत:च्या प्रयत्नांतून तब्बल ४७० पाणंद रस्ते खुले केले आहेत. या रस्त्यांची जीआयएस प्रणालीवर नोंद करण्यात आली असून, हे रस्ते नकाशावर पाहण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध केली आहे.