आठ बाधितांचा मृत्यू; कोरेगाव तालुक्यात चिंतेचे वातावरण

सिद्धार्थ लाटकर
Friday, 23 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 76 हजार 051 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 44 हजार 410 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 37 हजार 693 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 466 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार 251 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात 274 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच आठ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे देऊर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, तांदूळवाडी ता. कोरेगाव येथील 66 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये तरडगाव ता. फलटण येथील 70 वर्षीय महिला, वेळे कामटी ता. सातारा येथील 87 वर्षीय पुरुष, कर्वे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

बिहार जिंकण्यासाठीच भाजपचं लसीकरण; चव्हाणांची जाहीरनाम्यावर सडकून टीका

याबराेबरच कोरेगाव येथील 63 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले वजवडी ता. वाई येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण आठ कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काेरेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा काेराेनामुळे हाेत असलेला मृत्यू ही चिंतेची बाब बनली आहे. 

 

  • घेतलेले एकूण नमुने 176051
  •  
  • एकूण बाधित 44410
  •  
  • घरी सोडण्यात आलेले 37693
  •  
  • मृत्यू 1466
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 5251

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight Covid 19 Patients Passes Away Koregoan Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: