
भोसे: देवभूमी उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून, दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे १५० पर्यटक अडकले आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील झांजवड (ता. महाबळेश्वर) येथील सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधून मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेऊन या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दिला.