
कास : मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. कायम टिकणारे व कायदेशीर आरक्षण देण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे आणि त्यांचे त्यावर काम सुरू आहे. कायदा आणि नियमाच्या चौकटीत बसून मार्ग निघेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.