

सातारा : बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यांची विचारधारा होती, त्यामुळे त्यांचा नकली आवाज काढून बाळासाहेबांची विचारधारा कोणालाही मिटवता येणार नाही. गर्व से कहो हम हिंदू है, हा नारा बाळासाहेबांनी दिला होता; परंतु त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्यांना हा विचार पेलवला नाही. त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण खरी ठरली आहे. या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्व सांगण्यासाठी हिंदुत्वाला आणि बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.