Satara Crime: पोलिस असल्याचे भासवून पिंपोड्यात भरदिवसा वृद्धाला लुटले; तीन लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास
Pimpode robbery: या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती केली आहे.
पिंपोडे बुद्रुक : येथील सोनके ते वाठार मार्गावर काल सायंकाळी दोन अनोळखींनी पोलिस असल्याचे भासवून ६३ वर्षीय वृद्धाचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.