esakal | मुलीच्या वाढदिवसादिवशीच वडिलांवर काळाचा घाला
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीच्या वाढदिवसादिवशीच वडिलांवर काळाचा घाला

जिल्हा रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

मुलीच्या वाढदिवसादिवशीच वडिलांवर काळाचा घाला

sakal_logo
By
संजय शिंदे

सातारा : उडतारे (ता. वाई) येथील अमोल ऊर्फ शंभू अंकुश पवार (वय 30) यांना घरात पाणी भरण्याच्या मोटरीचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या नियोजन करण्यासाठी लगबग सुरू होती.
प्रसंगी पाण्यात बुडून मरू; परंतु घर सोडणार नाही

अचानक शॉक लागल्यानंतर त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले.

जाणुन घ्या, कोयना धरणातून केव्हा साेडले जाणार पाणी

उडतारे येथील अमोल ऊर्फ शंभू यांच्या मुलीचा चौथा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला होता. दिवसभर लाईट जात येत होती. पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी टेरेसवर पाणी नेण्यासाठी अंगणात मोटार सुरू करणार तेवढ्यात जोरात शॉक लागून ते खाली जमिनीवर पडले.

मुंबईच्या मुसळधार पावसात अभिनेते भारत गणेशपुरेंचा मोबाईल चोरीला, धक्कादायक अनुभव 

त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातले त्यांचे बंधू, पत्नी, आई-वडील बाहेर आले. शॉक लागल्याने ग्रामस्थांनी एका वाहनातून सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top