वक्‍तृत्व कला माथी भडकविण्यासाठी नकाे : श्रीमंत कोकाटे

वक्‍तृत्व कला माथी भडकविण्यासाठी नकाे : श्रीमंत कोकाटे

सातारा : वक्‍तृत्व ही कला हिंसा घडवण्यासाठी वापरली जाऊ नये. वक्‍तृव आणि लोकशाही यांचा दृढ संबंध असून, काळाच्या ओघात बुद्धी, ज्ञान, चातुर्य याद्वारे विचारांचे युद्ध करणारी ही कला झाली आहे. अनेकांना खिळवून ठेवणारी ही कला आहे, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. 

येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शखाली "वक्तृत्व कला विकास' या विषयावर झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. वक्‍तृत्वाचा विधायक उपयोग केलेल्यांची उदाहरणे देताना डॉ. कोकाटे म्हणाले, ""शब्द हे रत्नापेक्षा श्रेष्ठ आहेत. वक्‍तृत्व करणाऱ्यास नक्की काय सांगायचे माहीत असावे लागते. बुद्ध आणि महावीर यांच्या वक्‍तृत्वामागे त्यांचे समर्पण व त्याग होता. लोककल्याणाचा विचार होता. व्यवस्थेच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांचे निश्‍चित असे सम्यक विचार होते. त्यांच्या वक्‍तृत्वाने अंधश्रद्धा, कर्मकांड, शोषण नष्ट करण्याचा मार्ग मिळाला. नाना पाटील, विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हेही उत्तम वक्‍ते होते. उत्तम वक्ता होण्यासाठी आपण उत्तम असावे व अगोदर उत्तम श्रोता व्हावे.'' 

महावितरणनिर्मित 'आपत्ती' च्या शेतकऱ्यांना झळा; विसापुरकर आंदोलनच्या पावित्र्यात

उपप्राचार्या डॉ. अनिसा मुजावर यांचेही भाषण झाले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सुभाष वाघमारे प्रास्ताविक केले. डॉ. मानसी लाटकर यांनी वक्‍त्यांचा परिचय करून दिला. डॉ. कांचन नलावडे यांनी आभार मानले. प्रा. गजानन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. दुसऱ्या सत्रात श्वेता भामरे, शरयू बनकर (पुणे), निरंजन फरांदे, जयंतकुमार काटकर यांनी वक्‍तृत्व कलेचे विविध पैलू उलगडून दाखविले. झूम व यू ट्यूबद्वारे दोन हजार विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रा. डॉ. सुरेश झोडगे व प्रा. मनोहर निकम यांनी तांत्रिक सहकार्य केले.

महाबळेश्‍वर, पाचगणीत नाईट पार्ट्या, ऑर्केस्ट्रा, हॉटेलिंगचा धिंगाणा नाही चालणार : जिल्हाधिका-यांचा आदेश 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com