सातारा : देशात आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने छत्रपती शाहू कलामंदिर नाट्यगृहात सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह आणीबाणीत सहभागी नागरिक, महिला उपस्थित होते.