Heartbroken mother pleads for the return of missing bull ‘Dakkhan’ after it disappears from a Sangli fairground.
Sakal
-पांडुरंग बर्गे
कोरेगाव : अनेक बैलगाडा शर्यती जिंकलेला ‘दख्खन’ बैल हरवलेल्याला आज महिना झाला, तरी तो सापडला नसल्याने ‘दख्खन’चे मालकच नव्हे, तर राज्यासह प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील बैलगाडा मालक, शौकिनांत प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. तर ‘दख्खन’ हरवल्यापासून त्याच्या मालकाच्या वृद्ध आत्याच्या डोळ्यातील पाणी आटलेलं नाही. ‘हवं तर माझा जीव घ्या; पण आमचा दख्खन परत द्या...’ अशी आर्त हाक त्या मारत आहेत.