
-मनोज पवार
दुधेबावी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर असलेल्या लाखो वैष्णवांनी सातारा जिल्ह्यातील चार दिवसांचा मुक्काम उरकून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. बरड पालखी तळावर माउलींना निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय जमा झाला होता. यावेळी ‘माउली माउली’चा एकच गगनभेदी जयघोष करत ढगाळ वातावरणात सातारा जिल्हावासीयांनी ज्ञानियाचा राजा असणाऱ्या माउलींना साश्रूनयनांनी निरोप दिला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करत आहेत.