
सातारा: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करून घेण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासह अन्य मागण्यांबाबत आज संघटनांच्या वतीने जिल्हा परिषद ते पोवई नाका या मार्गावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.