
-उमेश बांबरे
सातारा: स्थानिक युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुक्ष्म, लघु व सेवा उद्योजकांना आर्थिक मदत केली जात आहे. या योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेची मर्यादा ५० लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढविली आहे. या योजनेत आतापर्यंत लघु व सेवा उद्योगांतून जिल्ह्यात ३०० कोटींची गुंतवणूक झाली आहे, तर ३६६० जणांना रोजगार मिळाला आहे. ९१५ जणांनी उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.