
मलकापूर : कऱ्हाड ते मलकापूर दरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा युनिक उड्डाणपूल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाणपुलाच्या कामात कोल्हापूर नाक्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्या अतिक्रमणांचा उड्डाणपुलाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता खुला केला.