

Vehicles lined up bumper-to-bumper at Kolhapur Naka and Malkapur as the post-holiday rush chokes highways across Maharashtra.
Sakal
मलकापूर: परिसरात सलग तीन दिवस पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वत्र गटार तुंबल्याने महामार्गाचे सेवारस्ते जलमय झाले. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालवताना वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यातच दिवाळी सुट्या संपल्याने महामार्गावरील वाहनाची संख्या वाढल्याने आज दिवसभर संथ गतीने वाहतूक सुरू होती. त्यामुळे महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.