Sitana laticeps habitat in Maharashtra
esakal
गोंदवले (सातारा) : किरकसालच्या माळरानावर ब्रॉड-हेडेड फॅन-थ्रोटेड लिझार्ड (Sitana laticeps) या दुर्मीळ सरड्याच्या प्रजातीचा अधिवास आढळून आला (Broad-Headed Fan-Throated Lizard) आहे. या नोंदीमुळे किरकसालच्या जैवविविधतेमध्ये आणखी एक मोलाची भर पडली असून, वन्यजीव अभ्यासकांना संशोधनासाठी मोठा उपयोग होणार आहे.