
S"Harasser Thrashed by Locals in Agashinagar, Later Handed to Police"
मलकापूर: रस्त्यावरून निघालेल्या युवतींची छेड काढणाऱ्या युवकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना आगाशिवनगर येथे गुरुप्रसाद ढाब्यासमोर घडली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार झाला. युवक दारूच्या नशेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित युवती महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.