
कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींनी आम्हाला मते दिल्याचे सांगितले. वास्तविक, लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करून सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला. त्या घोटाळ्यावर पांघरुणही घातले. सरकारने लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करून तिकडे लक्ष विचलित करून ईव्हीएम घोटाळ्यावर पांघरुण घातले आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली.