

Dr. Sudhir Pawar after completing his record-breaking 101 km run on the Satara–Medha–Satara route; 12 hours of nonstop endurance.
Sakal
सातारा: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये साताऱ्याचे नाव उंचावणाऱ्या डॉ. सुधीर पवार यांनी २६ ऑक्टोबरला सलग १२ तास धावण्याचा विक्रम केला. त्यांनी सातारा- मेढा- सातारा असे धावण्यास सुरुवात केली आणि १२ तास २५ मिनिटे सलग धावत त्यांनी १०१ किलोमीटर अंतर पूर्ण केले. हे अंतर त्यांनी दोन वेळा धावून पूर्ण केले.