कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश, कऱ्हाडात पोलिसांनी घेतलं ताब्यात

काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती.
Fake Doctor
Fake DoctorGoogle

कऱ्हाड (सातारा) : काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (Primary Health Centre) असलेल्या नारायणवाडी येथे बोगस डॉक्टरकडून (Fake Doctor) कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाने संयुक्तरित्या कारवाई करुन संबंधित बोगस डॉक्टर महिलेला ताब्यात घेतले आहे. (Fake Doctor Arrested At Primary Health Centre In Karad Satara Marathi News)

काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. ती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, पोलिस, प्रशासन यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यातून रुग्णसंख्या कमी होवू लागली आहे. मात्र, नारायणवाडी येथे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. यादव यांना मिळाली. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.

Fake Doctor
म्युकरमायकोसिसचे 21 संशयित रुग्ण आढळले; यंत्रणा सतर्क

त्यावरुन पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डांगे, अशोक भापकर यांनी कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये संबंधित बोगस डॉक्टरला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. डांगे यांनी सांगितले.

Fake Doctor Arrested At Primary Health Centre In Karad Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com