

Fraud & Misconduct: Fake Doctor Booked in Karad for Outrage of Modesty
Sakal
कऱ्हाड : मुंढे (ता. कऱ्हाड) येथे उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अटक केलेल्या डॉक्टरकडे पोलिसांनी तपास केला असता तो डॉक्टरच नसल्याचे उघडकीस आले आहे. अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय चालू करून शासनाची व रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.