
सातारा : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया दिवसेंदिवस संभ्रम निर्माण करणारी सुरू आहे. या बदली प्रक्रियेतून सूट मिळण्यासाठी, संवर्ग एक व दोनमध्ये बदलीचा लाभ मिळण्यासाठी चुकीची कागदपत्रे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्याचे शिक्षकांची पाचावर धारण बसली आहे.