
वहागाव : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने आज पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोल नाक्यावर सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई केली. विनापरवाना मद्य वाहतूकप्रकरणी टेंपोसह सुमारे एक कोटी २२ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.