

Mysterious Death of Elderly Man Sparks Protest in Wai; Family Demands Investigation
वाई: एकसर येथील वृद्धाच्या अकस्मात मृत्यूबाबत ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून, त्याबाबत नातेवाइकांची तक्रार घेऊन त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यामार्फत योग्य पद्धतीने पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी आज येथे दिली. दरम्यान, क्रशर मालकावर गुन्हा दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी रात्री पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.