

Jeep and rickshaw badly damaged after collision in Masur; one woman dead and seven seriously injured.
मसूर : निकृष्ट दर्जाच्या मसूर- उंब्रज रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव जीपने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली, तर सात महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. अपघातात रेशमा रमजान मुजावर (वय ४८, रा. खडकपेठ, मसूर) या जागीच ठार झाल्या. अन्य जखमी महिलांवर उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.