esakal | शेतकऱ्यांना कर्जासह वीजबिलातून मुक्ती द्या; शिष्टमंडळाची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

Farmer Association
शेतकऱ्यांना कर्जासह वीजबिलातून मुक्ती द्या; शिष्टमंडळाची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कोरोना काळात आर्थिक संकटातील शेतकरी, शेतीपूरक उद्योग, लघुउद्योजकांना सरसकट कर्जमुक्त करा, त्यांना कर्जासह वीजबिलातून मुक्ती द्या, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते अनिल घराळ, शेतकरी संघटना क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन दिले.

प्रांताधिकारी कार्यालयातील श्री. ठोंबरे यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात कामगार नेते घराळ, श्री. पाटील उपाध्यक्ष हिंदुराव पाटील, विभागप्रमुख जयवंत पाटील, शहरप्रमुख जिकर बागवान, फय्याज इनामदार, महिला गडच्या रंजना पाटील, ऍड. अश्विनी पाटील, आनंदराव थोरात, असलम आंबेकरी, ज्ञानदेव पाटील, प्रसाद पाटील, वैभव पाटील, दिनेश माने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की कोरोनामुळे आर्थिक संकटात शेतकरी व लघुउद्योजक, शेतीपूरक व्यवसाय अडचणीत आले आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक घडी विस्कटली आहे.

15 मे'पर्यंत लावलेला लॉकडाउन पूर्णपणे पाळा; पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

Edited By : Balkrishna Madhale